सोमनाथ चॅटर्जी

सोमनाथ चॅटर्जी

सोमनाथ चॅटर्जी (जन्म : तेजपूर-आसाम, २५ जुलै १९२९; - कलकत्ता, १३ ऑगस्ट २०१८) हे मुळात कम्युनिस्ट पक्षाचे (CPIचे)नेते होते. १९६८ साली ते मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षात गेले. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार (CPI-Mचे उमेदवार) म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते इ.स. १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.

अभ्यासू वृत्ती, आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला.. जुलै इ.स. २००८ मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे मार्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इ.स. २००९ची लोकसभा निवडणूक न लढवता सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.

बालपण

सोमनाथ चॅटर्जी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट नव्हती, पण आईमुळे सबंध कुटुंबात ’साधी राहणी’ हे तत्त्व सहजपणे रुजले होते. सोमनाथांच्या आईचे नाव वीणापाणिदेवी. सोमनाथांचे वडील निर्मलचंद्र चॅटर्जी बंगाल हिंदू महासभेचे एक संस्थापक व अध्यक्ष होते. त्यामुळे घरात राजकारणाचा वारसा होता. वडील मानवाधिकाराच्या क्षेत्रात काम करीत असल्याने त्यांच्याकडे राजकीय-सामाजिक क्षेत्रातले बरेच कार्यकर्ते येत. सिटूचे (सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे) कार्यकर्तेही येत. त्यांच्यामुळेच सोमनाथ चॅटर्जी कम्युनिस्ट पक्षाकडे ओढले गेले. सन १९६८मध्ये ते कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.

मृत्यू

सोमनाथ चॅटर्जींचे १३ ऑगस्ट २०१८ रोजी कोलकातातील राहत्या घरी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले.

सोमनाथ चॅटर्जी यांनी लिहिलेली पुस्तके

  • Collected Speeches Of Somnath Chatterjee (२०१२)
  • Keeping The Faith : Memoirs Of A Parliamentarian (प्रकाशनाची तारीख - ऑगस्ट २०१४). (मराठी अनुवाद - तपनिष्ठेची जपणूक. अनुवादक - शारदा साठे, राजहंस प्रकाशन - २०१५)
मागील:
मनोहर जोशी
लोकसभेचे अध्यक्ष
जून ४, इ.स. २००४मे १६, इ.स. २००९
पुढील:
मीरा कुमार

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!