२१° १०′ ००″ N, ७९° ३९′ ००″ E
भंडारा शहर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा या भंडारा शहरातून जातो. वैनगंगा नदी व सूर नदी या दोन नद्यांनी हे शहर त्रिभागले आहे. शहरालगतच्या परिसरात अशोक लेलॅन्ड, सनफ्लॅग आयर्न अँड स्टील फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी या सारखे उद्योग आहेत. सारख्या येणाऱ्या पुरामुळे शहराला चहूबाजूंनी प्रोटेक्शन भिंतींनी घेरले आहे.भंडारा जिल्हात महासमाधी भूमी , कोरंभी मंदिर असे अनेक स्थळे बघण्यासारखे आहेत
भंडाऱ्याचे तापमान प्रत्येक ऋतूत अगदी टोकाचे असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४५ अंश सेल्सियस आणि हिवाळ्यात कमीत-कमी ८ अंश सेल्सियस तापमान असते..
२०११साली झालेलया जनगणनेमध्ये, भंडारा शहराची लोकसंख्या ११,९८,८१० होती. त्यांत पुरुष ५१% व महिला ४९% होत्या. भंडारा येथे सरासरी साक्षरता दर ८०% आहे हा. ७४.०४% या राष्ट्रीय सरासरी पेक्षा किंचित जास्त आहे. शहरातील ८५% पुरुष आणि ७५% स्त्रिया साक्षर आहेत. भंडारा शहरात ६ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ११% आहे.
सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत त्यात ५.६५ % इतकी वाढ झाली आहे.[१]
अशोक लेलॅंड (जड वाहन निर्माता), सनफ्लॅग (लोखंड आणि स्टील कंपनी), आयुध कारखाना, एलोरा पेपर मिल आणि मॅंगेनिझ माती खाणी येथे आहेत. व्हिडीओकॉन इंटरनॅशनलचा इलेक्ट्रॉनिक्स हा प्रस्तावित कारखाना भंडाराशहरा जवळच होणार आहे. (२०१७ची स्थिती). शहरामधून एक रेल्वे लाईन जाते, ती पूर्वी आयुध निर्माण कारखान्यासाठी किवा सनफ्लॅग या उद्योगांसाठी वापरली जात होती.
भंडारा शहरात एक पुरातन किल्ला आहे. तो पांडे घराण्याचा असून त्याला पांडे महल असे म्हंटले जाते. तेथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. हा महाल पर्यटकाना पहायला सुद्धा उघडा असतो.
बहिरंगेश्वर मंदिर हे अजून एक पुरातन मंदिर शहरात आहे. बहिरंगेश्वर मंदिरात महाशिवरातीचा उत्सव होतो. त्यावेळी तेथे संपूर्ण जिल्ह्यातील भाविक उपस्थित असतात. मंदिर पुरातन असल्यामुळे बहरंगेश्वर मंदिराला अनेक लोक ग्रामदेवता मानतात. खांब तलाव हा ऐतिहासिक तलाव बहिरंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे तिथे तलावामधोमध एक खांब आहे. हा खांब ऐतिहासिक आहे असे मानले जाते.
भंडारा शहरात एक शंभर वर्षापेक्षा जुने सार्वजनिक वाचनालय आहे.
गांधी चौकात उभारलेला १२१ फूट उंच तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावणदहन हे दरवर्षीचे आकर्षण असते.
|ॲक्सेसदिनांक=