बनासकांठा जिल्हा गुजरातमधील उत्तर भागात असलेला एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण पालनपूर येथे आहे. या जिल्ह्यातून बनास नदी वाहते. राजस्थानच्या अरवली पर्वतातून उगम पावलेली ही नदी जिल्ह्यातून वहात वहात शेवटी कच्छच्या रणात विलीन होते.
बनास नावाची आणखी एक नदी राजस्थानात आहे, ती चंबळ नदीची उपनदी असून तिच्यासह यमुना नदीला मिळते.