नांदगाव विधानसभा मतदारसंघ - ११३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. नांदगाव तालुका आणि २. मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निंबायत), निमगांव आणि कळवाडी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे सुहास द्वारकानाथ कांदे हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
निवडणूक निकाल
संदर्भ
बाह्य दुवे