आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.
आमदाराचा कालावधी
विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते, परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.आमदार होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही २५ वर्ष असणे आवश्यक असते.
आमदारांची आकडेवारी
सध्या उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक ४०३ आमदार आहेत.तसेच सिक्कीम राज्यातील विधानसभेत सर्वात कमी ३२ आमदार आहेत.संपूर्ण भारत देशात सध्या ४१२३ आमदार आहेत.
भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आमदारांची संख्या
संदर्भयादी
१.https://en.m.wikipedia.org/wiki/Uttar_Pradesh_Legislative_Assembly
२.https://en.m.wikipedia.org/wiki/State_legislative_assemblies_of_India