२०१७ डेझर्ट टी२० चॅलेंज[१] ही स्पर्धा दुबई येथील आयसीसी अकादमी मैदानावर येथे १४ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान पार पडलेली आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट स्पर्धा आहे.[२] एकूण आठ असोसिएट सदस्य संघ सदर स्पर्धेमध्ये सहभागी झाले.[२]पापुआ न्यू गिनीने स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या ऐवजी आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा नसलेला नामिबियाचा संघ सहभागी झाला.[३] त्यामुळे निमिबीया खेळत असलेले सर्व सामने ट्वेंटी२० सामने म्हणून खेळवले गेले.
अ गटातून अफगाणिस्तान आणि आयर्लंड तर ब गटातून स्कॉटलंड आणि ओमान अंतिम फेरीसाठी पात्र झाले.[६] अंतिम सामन्यान अफगाणिस्तानने आयर्लंडचा १० गडी राखून दणदणीत पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले.[७]