२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषकफुटबॉल स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशामध्ये ९ ते ३१ जानेवारी इ.स. २०१५ दरम्यान खेळवली गेली. ए.एफ.सी.द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला.
३१ जानेवारी रोजी सिडनीच्यास्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरियाचा अतिरिक्त वेळेत २-१ असा पराभव करून हा चषक पहिल्यांदाच जिंकला. ह्या अजिंक्यपदासोबत ऑस्ट्रेलियाला रशियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमध्ये आपोआप पात्रता मिळाली. गतविजेत्या जपानला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्कारावा लागला.