आशिया फुटबॉल मंडळ (Asian Football Confederation) हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी ए.एफ.सी.वर आहे. दर चार वर्षांनी ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी.द्वारे आयोजित केली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे.