व्हियेतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, जो व्हियेतनाममधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक बौद्ध धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये चीन व जपान नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो.[१][२]दक्षिण आशियातून (भारत) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात बौद्ध धर्म पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४)च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला.[३] त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हियेतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे ताओ धर्म, चीनी आध्यात्मिकता आणि व्हियेतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.[४][५]
^Tuckwell, Paul (2013-06-25). "Vietnam | World Prayer News". Global Connections (इंग्रजी भाषेत). 2018-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.