मिकेलेंजेलो

मिकेलेंजेलो

पूर्ण नावमिकेलेंजेलो दि लोदोविको ब्वोनारॉती सिमॉनि
जन्म मार्च ६, १४७५
अरेझ्झो, तोस्काना, इटली
मृत्यू फेब्रुवारी १८, १५६४
रोम, इटली
राष्ट्रीयत्व इटली ध्वज इटली
कार्यक्षेत्र चित्रकला, अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, मूर्तिकला, काव्य
शैली इटालियन रानिसां
प्रसिद्ध कलाकृती पिएटा, डेव्हिडचा पुतळा

मिकेलेंजेलो बुओनारोती (मार्च ६, इ.स. १४७५फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल ॲन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटाडेव्हिड ह्या रानिसांमधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात.


१४९९ साली घडवलेले येशू ख्रिस्ताचेचे शरीर त्याच्या आई मेरीच्या मांडीवर दाखविणारे पिएटा शिल्प

१५०४ साली बनवलेला डेव्हिडचा पुतळा

वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मिकेलेंजेलो दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढ्य आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मिकेलेंजेलोचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले.

१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मिकेलेंजेलोचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. बॅटल ऑफ लॅपीत्झ हे मिकेलेंजेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मिकेलेंजेलोने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील पिएता, डेव्हिड, टुम्ब ऑफ लॉरेन्झो दि मेदिची, डे अँड नाइट, डस्क ऑफ डॉन ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. याच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे.

१५३४ साली मिकेलेंजेलो रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसऱ्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मिकेलेंजेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मिकेलेंजेलोने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चित्रकृतींसाठी मिकेलेंजेलो प्रसिद्ध आहे. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मिकेलेंजेलोने ३०० मानवाकृती रंगविलेल्या आहेत.या छताशिवाय मिकेलेंजेलोच्या द लास्ट जजमेंट, क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स आणि कन्व्हर्शन ऑफ सेंट पॉल या चित्रकृती प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा पहा

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!