मंगोलिया हा एक बौद्ध बहुसंख्य देश आहे. काही अहवालांनुसार, मंगोलियाची ९३% लोकसंख्या (३० लाख) बौद्ध धर्मीय आहे.[१][२] तथापि, २०१० च्या मंगोलियाच्या जनगणनेनुसार, बौद्ध धर्म हा मंगोलियाच्या ५३% लोकसंख्येद्वारे अनुसरला जाणारा मंगोलियाचा सर्वात मोठा धर्म आहे.[३][४] मंगोलियामधील बौद्ध धर्माची अलिकडील वैशिष्ट्ये गेलुग आणि कागिय वंशाच्या तिबेटी बौद्ध धर्मामधून प्राप्त झाली आहेत, परंतु ती वेगळी आहे आणि स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्येही प्रस्तुत करते.
मंगोलिया मध्ये बौद्ध धर्माची सुरुवात युआन घराण्याच्या (इ.स. १२७१ — १३६८) सम्राटांच्या तिबेटी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तनापासून झाली. मंगोल साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर मंगोल लोकांनी शॅमनिक परंपरा परत केल्या, परंतु १६व्या आणि १७व्या शतकात बौद्ध धर्म पुन्हा येथे रुजला.
मंगोलिया मधील बौद्ध हे प्रामुख्याने वज्रयान या बौद्ध संप्रदायाचे आहेत.
^2010 Population and Housing Census of Mongolia. Data recorded in Brian J. Grim et al. Yearbook of International Religious Demography 2014. BRILL, 2014. p. 152