एल्फिन्स्टन रोड, अधिकृतपणे प्रभादेवी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहराच्या परळ-दादर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्यापश्चिम मार्गावर स्थित आहे. मध्य मार्गावरीलपरळ हे स्थानक एल्फिन्स्टन रोडसोबत एका पादचारी पुलाने जोडण्यात आले असून येथे मार्ग बदलणे शक्य आहे. सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. जलद गाड्या येथे थांबत नाहीत.
ह्या स्थानकाचे नाव मुंबईचा गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टनच्या गौरवार्थ ठेवण्यात आले होते. ते १८५३-१८६० पर्यंत बॉम्बेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त होते. महाराष्ट्र विधानसभेने प्रभादेवी या नावानिमित्त १६ डिसेंबर २०१६ रोजी ठराव केला.[१] प्रभादेवी हे नाव हिंदू देवी प्रभाती देवी असे आहे. एक १८व्या शतकातील मंदिराच्या आतच देवीची बारावी शतकातील मूर्ती स्थित आहे.[२] ६ मे २०१७ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर केला.[३][४] पश्चिम रेल्वे यांनी १९ जुलै २०१८ रोजी नाव बदलण्यास सुरुवात केली.[५][६][७]