कोलोराडो हे जुलै ४, इ.स. १८७६ रोजी अधिकृतपणे संयुक्त संस्थानात समाविष्ट झाले. याच दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे कोलोराडोला शतकी राज्य (सेन्टेनियल स्टेट) असे म्हणले जाते.
भूगोल
कोलोराडो राज्याचे दोन मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. राज्याच्या पूर्व भागात सपाट प्रेअरी मैदाने आहेत तर पश्चिम भाग हा अर्ध पर्वतीय प्रदेश आहे.
पूर्व
पश्चिम
रॉकी माऊंटन पर्वतरांगांतील मुख्य रांग राज्याच्या मध्यातून उत्तरदक्षिण गेलेली आहे, तर इतर पर्वतरांगा पश्चिमेस आहेत. अमेरिकेतील १०,०००फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या जमिनीपैकी अर्ध्याहून अधिक जमीन कोलोराडोत आहे.[२] हीत १४,००० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ५३ शिखरांचा समावेश होतो.
कोलोराडोचे प्रशासन अमेरिकेतील इतर राज्यांप्रमाणे आहे. कोलोराडोचे गव्हर्नकोलोराडोचा गव्हर्नर]] राज्याचा मुख्याधिकारी असतो. याची निवडणूक थेट मतदानाने होते. कोलोराडोचे प्रतिनिधीगृह व सेनेट ही दोन सभागृहे राज्यातील कायदे करण्याचे तसेच अंदाजपत्रक पारित करण्याचे काम करतात.
कोलोराडो राज्य ६४ काऊंट्यांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक काऊंटीचे स्वतंत्र प्रशासन असते. डेन्व्हर, ब्रूमफील्ड आणि बोल्डर या काऊंट्यांचे प्रशासन त्या त्या शहराच्या प्रशासनाद्वारे चालते.
संदर्भ आणि नोंदी
^ ab"२००० जनगणना". जुलै १८,२००७ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)