कॅन्सस (इंग्लिश: Kansas) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. [१]अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले कॅन्सस क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १५ वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३४ व्या क्रमांकाचे राज्य आहे.[२]
कॅन्ससच्या उत्तरेला नेब्रास्का, पूर्वेला मिसूरी, पश्चिमेला कॉलोराडो, तर दक्षिणेला ओक्लाहोमा ही राज्ये आहेत. टोपेका ही कॅन्ससची राजधानी तर विचिटा हे येथील सर्वात मोठे शहर आहे. कॅन्सस सिटी ह्या नावाचे मोठे शहर वास्तविकपणे मिसूरी राज्यात असून त्याची अनेक उपनगरे कॅन्ससमध्ये मोडतात.
[३]ऐतिहासिक काळापासून इंडियन अदिवासी समाजातील असंख्य जातींचे कॅन्सस भागात वास्तव्य राहिले आहे. सध्या कॅन्सस हे अमेरिकेमधील सर्वात मोठ्या कृषीप्रधान राज्यांपैकी एक आहे. येथे गहू, ज्वारी व सूर्यफूल ह्या पिकांची मोठ्या प्रमाणावर शेती होते.[४]