ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने एप्रिल १९८३ मध्ये एकमेव कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाचा हा श्रीलंकेचा पहिला अधिकृत दौरा होता. या आधी अनेकवेळा ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेत प्रथम-श्रेणी सामने खेळण्यासाठी दौरे केले होते. एकमेव कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-० ने जिंकत पहिला वहिला एकदिवसीय मालिका विजय नोंदविला.