ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९५९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व रिची बेनॉ यांनी केले. ही मालिका चालू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी कराची येथील ३री कसोटी स्वतः स्टेडियममध्ये जाऊन बघितली.