इफ्तिखार अली खान पटौडी (मार्च १६, इ.स. १९१० - जानेवारी ५, इ.स. १९५२) हा पटौडीचा नवाब व भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार होता. भारतीय क्रिकेट संघाकडून व तत्पूर्वी इंग्लिश कसोटी संघाकडूनही खेळलेला इफ्तिखार अली खान दोन देशांकडून क्रिकेट खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक होता. इफ्तिखार अली खानाचा मुलगा मन्सूर अली खान हादेखील पुढील काळात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून खेळला.
बाह्य दुवे