आनंद हा हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील एक अजरामर कलाकृति आहे.आनंद हा सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या दैदीप्यमान कारकीर्दितिल एक मानाचे पान होय.राजेश खन्ना यानी साकारलेेेली आनंद ही व्यक्तिरेेेखा अतिशय लोकप्रिय झाली होती.राजेश खन्नाच्या आनंद ने अख्या भारतीयांच्या मनावर अधिराज्य केले होते.
ह्रषिकेश मुखर्जी यांचे महान दिग्दर्शन व राजेश खन्ना यांचा उत्कृष्ट व जीवंत अभिनय यांमुळे आनंद हा चित्रपट एक अजरामर कलाकृती ठरला.
सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सुंदर व लोभस व्यक्तीमत्व व स्वतच्या मृत्यूची वेळ जवळ आलेली माहिती असुनहि उरलेले क्षण आनंदाने जगणारा आनंद एकमेकात इतके एकजीव झाले कि या चित्रपटाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले व हा चित्रपट खन्ना यांच्या सुपरस्टार कारकीर्दितला एक मानाचा मुकुट ठरला.
राजेश खन्ना यानी आनंदची भूमिका नुसती साकारली नाहि तर ही भूमिका स्वतः जगली होती.राजेश खन्नानी आनंदच्या तोंडचे सर्व डायलॉग आपल्या विशिष्ट संंवाद शैलीने अजरामर केले."बाबू मोशाय, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं" सारखे डायलॉग आजहि प्रेक्षकांच्या मनावर कोरलेले आहेत.
आनंद व्यक्तिरेखा स्वतः ह्र्षिकेश मुखर्जी यांनी लिहिली होती.
सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरुणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.एवढा लोकप्रियतेचा सन्मान इतर कुठल्याहि स्टारला मिळालेला नाही.
आनंद प्रर्दशित झाला तेंव्हा खन्ना यांचे सुपरस्टारडम अत्युच्च शिखरावर होते.आनंदची व्यक्तीरेखा साकारणे एक आव्हान होते.असाध्य व्याधीमुळे मृत्यु जवळ दिसत असुनहि आपले दुख: जगापासुन लपवुन उरलेले दिवस आनंदाने जगणारा आनंद ही रेखा म्हणजे टोकाचे दुख: व टोकाचा आनंद दाखवणारी व्यक्तिरेखा होती.पण नाटकातुन चित्रपटात आलेल्या खन्ना यांच्या रक्तात अभिनय ठासुन भरलेला होता.अभिनयाचे व्याकरण त्यांना माहिती होते.त्यामुळे आनंद व्यक्तिरेखा त्यानी उत्कृष्ट रित्या साकारून चित्रपट अजरामर केला.
आनंदने दैदीप्यमान व्यावसायिक यश तर मिळवलेच व समिक्षकांची सुद्धा वाहवा मिळवली.अभिनय व दिग्दर्शना साठिचे फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळवले.
पार्श्वभूमी
सुरुवातीला ह्रषिकेश मुखर्जी यांनी आनंद ही व्यक्तिरेखा राज कपुर याना डोळ्या समोर ठेेेेऊन लिहिली होती.पण काहि कारणास्तव राज कपूर यांना हां चित्रपट करणे शक्य झाले ले नाही आणि ही भूमिका सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या वाट्याला आली.
कथानक
उल्लेखनीय
पुरस्कार
बाह्य दुवे
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | |
---|
१९८१-२००० | |
---|
२००१ - २०२० | |
---|
२०२१- सद्द्य | |
---|