पुरुषांच्या स्पर्धेत एकूण सात देश (आर्जेन्टिना, ब्राझील, चिले, कोलंबिया, मेक्सिको, पेरू आणि उरुग्वे) भाग घेतील. या सातपैकी उरुग्वे आणि कोलंबिया हे आयसीसीचे सदस्य नसल्यामुळे त्यांच्याशी खेळले गेलेले सामने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
महिलांच्या स्पर्धेत एकूण पाच देश (आर्जेन्टिना, ब्राझील, चिले, मेक्सिको आणि पेरू हे भाग घेतील. सर्व देश आयसीसीचे सदस्य असल्यामुळे सर्व सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा असणार आहे.