२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०१वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.
मुख्य स्पर्धा
पुरुष एकेरी
नोव्हाक जोकोविचने अँडी मरेला 6–7(2–7), 7–6(7–3), 6–3, 6–2 असे हरवून ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा (एकूण ४ वेळा) जिंकली.
महिला एकेरी
व्हिक्टोरिया अझारेन्काने ली नाला 4–6, 6–4, 6–3 असे हरवून ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.
पुरुष दुहेरी
बॉब ब्रायन / माइक ब्रायननीं रॉबिन हासे / इगोर सायस्लिंग ह्यांना 6–3, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
सारा एरानी / रॉबेर्ता व्हिंचीनीं ॲश्ले बार्टी / केसी डेलाका ह्यांना 6–2, 3–6, 6–2 असे हरवले.
मिश्र दुहेरी
यार्मिला गाय्दोसोव्हा / मॅथ्यू एब्डननीं ल्युसी ह्रादेका / फ्रांतिसेक सेर्माक ह्यांना 6–3, 7–5 असे हरवले.