२०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील टेनिस हा खेळ लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरामधील ऑल इंग्लंड क्लब येथील गवताळ कोर्टांवर २८ जुलै ते ५ ऑगस्ट, २०१२ दरम्यान खेळवण्यात आला. ग्रास कोर्टवर ऑलिंपिक स्पर्धेमधील टेनिस खेळवण्यात आलेली ही पहिलीच वेळ होती. ह्या खेळाचे पुरूष एकेरी, पुरूष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी असे पाच प्रकार भरवण्यात आले ज्यांमध्ये एकूण १९० टेनिसपटूंनी सहभाग घेतला. ह्या स्पर्धा आय.ओ.सी.ने आयोजित केल्या व ए.टी.पी. तसेच डब्ल्यू.टी.ए. ह्या टेनिस संस्थांचा पाठिंबा होता.
पदक माहिती
पदक तक्ता
प्रकार