हुआन मार्तिन देल पोत्रो (स्पॅनिश: Juan Martín del Potro) हा एक आर्जेन्टाईन टेनिसपटू आहे. २००८ साली व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केल्यानंतर देल पोत्रोने सलग पहिल्या चार स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. २००९ सालची युएस ओपन जिंकणारा देल पोत्रो हा दुसरा आर्जेन्टाईन ग्रँड स्लॅम विजेता आहे. तसेच रॉजर फेडरर व रफायेल नदाल ह्या दोघांना एकाच स्पर्धेत पराभूत करण्याचा विक्रम करणारा देल पोत्रो हा पहिला टेनिस खेळाडू आहे.
जानेवारी २०१० मध्ये एटीपी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोचलेला देल पोत्रो मनगट दुखापतीमुळे २०१० सालामधील बऱ्याचशा स्पर्धा खेळू शकला नाही. सध्या देल पोत्रो १३व्या क्रमांकावर आहे.
बाह्य दुवे