विस्डेन चषक ही इंग्लंड व वेस्ट इंडीज ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९६३ मध्ये वेस्ट इंडीजच्या इंग्लंड दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. २०२० च्या मालिकेत हा चषक निवृत्त करण्यात आला. इथून पुढे वेस्ट इंडीज-इंग्लंड कसोटी मालिकांना रिचर्ड्स-बॉथम चषक या नावाने ओळखले जाईल.
विस्डेन चषकात एकूण १२० कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडीजने ४८, इंग्लंडने ३६ जिंकले, ३६ कसोट्या अनिर्णित राहिल्या.
निकाल