पोर्तू अलेग्री (पोर्तुगीज: Porto Alegre) ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो सुल ह्या सर्वात दक्षिणेकडील राज्याची राजधानी, देशातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर क्षेत्र आहे.
हे शहर १७७२ साली असोरेस येथून स्थानांतरित झालेल्या लोकांनी वसवले. त्यानंतर जर्मनी, इटली, पोलंड इत्यादी देशांमधून आलेले अनेक लोक येथे स्थायिक झाले. सध्या पोर्तू अलेग्री शहराची लोकसंख्या १४ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ४० लाख आहे.
२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी पोर्तू अलेग्री एक असून येथील एस्तादियो बेईरा-रियो स्टेडियममध्ये विश्वचषकातील ५ सामने खेळवले जातील.
बाह्य दुवे