दानिल मेदवेदेव्ह (रशियन: Дании́л Серге́евич Медве́дев, ११ फेब्रुवारी १९९६) हा एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत मेदवेदेव्ह सध्या नोव्हाक जोकोविच खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १३ एकेरी स्पर्धा जिंकल्या असून २०२१ यू.एस. ओपन स्पर्धेमध्ये विजय मिळवून त्याने आपली पहिलीवाहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली. ह्यापूर्वी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी त्याने गाठली होती.
२०१५ मध्ये वायसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केलेल्या मेदवेदेव्हने २०१६ विंबल्डन स्पर्धमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्तानिस्लास वावरिंकाला पराभूत करून टेनिस जगताचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासून मेदवेदेव्हने अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला असून तो आजच्या घडीला पुरुष टेनिसमधील आघाडीचा खेळाडू मानला जातो.
कारकीर्द
निकाल
|
वर्ष
|
स्पर्धा
|
प्रकार
|
प्रतिस्पर्धी
|
स्कोअर
|
उप-विजेता |
२०१९ |
यू.एस. ओपन |
हार्ड |
रफायेल नदाल |
५-७, ३-६, ७-५, ६-४, ४-६
|
उप-विजेता |
२०२१ |
ऑस्ट्रेलियन ओपन |
हार्ड |
नोव्हाक जोकोविच |
५-७, २-६, २-६
|
विजेता |
२०२१ |
यू.एस. ओपन |
हार्ड |
नोव्हाक जोकोविच |
६-४, ६-४, ६-४
|
उप-विजेता |
२०२२ |
ऑस्ट्रेलियन ओपन |
हार्ड |
रफायेल नदाल |
६-२, ७-६, ४-६, ४-६, ५-७
|
बाह्य दुवे