काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.[१]
सर्वसाधारणपणे, प्रतितास १॰॰ मिलीमीटर (३.९ इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते.