चोळ साम्राज्य

चोळ साम्राज्य
சோழ நாடு
इ.स.पू. ३००इ.स. १२७९
ध्वज
राजधानी तंजावर, गंगैकोंड चोलपुरम्
अधिकृत भाषा तमिळ
क्षेत्रफळ ३६,००,००० वर्ग किमी चौरस किमी
आजच्या देशांचे भाग भारत ध्वज भारत


श्रीलंका ध्वज श्रीलंका
बांगलादेश ध्वज बांग्लादेश
म्यानमार ध्वज बर्मा
थायलंड ध्वज थायलंड
मलेशिया ध्वज मलेशिया
कंबोडिया ध्वज कंबोडिया
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया }
सिंगापूर ध्वज सिंगापूर


Flag of the Maldives मालदीव

चोळ साम्राज्य (तमिळ: சோழ நாடு, चोळर कुळ ; रोमन लिपी: Chola dynasty) हे दक्षिण भारतातील एक साम्राज्य होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ मौर्य सम्राट अशोकाने घडवून घेतलेल्या अशोकस्तंभांवरील लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती.

कावेरी नदीच्या खोऱ्यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. इ.स.च्या ९व्या शतकापासून इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. पहिला राजराज चोळपहिला राजेंद्र चोळ यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य भारतीय द्वीपकल्पआग्नेय आशियात पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, श्रीलंकेचा काही भाग जिंकून मालदीव द्वीपसमूहावर कब्जा मिळवला[ संदर्भ हवा ]. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने श्रीविजय साम्राज्यास नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच पाटलीपुत्राच्या पाल साम्राज्याच्या सैन्याचा पराभव करत वर्तमान आंध्र प्रदेशातील गोदावरी तीरापर्यंत राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात पांड्यांची प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९ च्या सुमारास तिसऱ्या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली[ संदर्भ हवा ].

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!