हर्यक वंश

हर्यक राजवंशाची स्थापना इ.स.पू. ५४४मध्ये राजा बिंबिसार याने केली. बिंबिसारने राजगीर शहराची निर्मिती करून ती आपली राजधानी बनवली. हा बिंबिसार, गौतम बौद्ध यांचा समकालीन होता. त्याच्या दरबारी असलेल्या वैद्य जीवकाला गौतम बुद्धाच्या सेवा शुश्रूषेसाठी पाठवले होते. बिंबिसारनंतर त्याचा मुलगा अजातशत्रू गादीवर बसला अजातशत्रू - याचे आणखी एक नाव कुणिक असे ही होते. याच्याच काळात बौद्ध धर्माची पहिली संगीती ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये राजगृह(राजगीर)ला भरली होती. उदयीन - अजातशत्रूनंतर त्याचा मुलगा उदयीन हा हर्यक वंशाच्या गादीवर बसला.उदयीनने आपली राजधानी राजगीरवरून पाटलीपुत्रला नेली. नादशक हा हर्यक वंशाचा शेवटचा राजा होता नागदशकचा अमात्य शिशुनाग याने नागदशकची गादी बळकावून शिशुनाग वंशाची स्थापना केली होती.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!