ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीपला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेरच्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोन्टो’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या.[ संदर्भ हवा ]
शिक्षण
कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून इ.स. १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.[ संदर्भ हवा ]
विवाह
शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचेप्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचेनातेप्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली.[ संदर्भ हवा ]
कार्य
डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.[ संदर्भ हवा ]
कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र
कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्याटिळक ’ हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले. लहान मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी विविध उद्दिष्टे त्यामागे आहेत.[ संदर्भ हवा ]
कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.[ संदर्भ हवा ]
या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.[ संदर्भ हवा ]
दर रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.[ संदर्भ हवा ]
काही तज्ज्ञ व्यक्तींना व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली आहे.[ संदर्भ हवा ]
कल्पना चावला विज्ञान केंद्राने २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.[ संदर्भ हवा ]
कल्पना चावला यांचे मराठी सुविचार
मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असतां.
ग्रंथ
भारतकन्या कल्पना चावला (अनुवादित पुस्तक, मूळ लेखक - पंकज किशोर, मराठी अनुवाद - डाॅ. कमलेश मेटकर)
महान स्त्रिया: लेखिका - अनुराधा पोतदार (परी प्रकाशन कोल्हापूर)
संदर्भ
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!