इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड एन्.आर. नारायण मूर्ती आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यातजुलै २१९८१ मध्ये स्थापन केली.[१] राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले.[२] कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे माटुंगा, उत्तर-मध्य मुंबई येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते.
२००१ मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता" (नियुक्तकर्ता) किताब दिला होता.[३]
महत्त्वाचे विभाग
इन्फोसिसमध्ये सेवाक्षेत्रांनुसार विभाग करण्यात आले आहेत. त्यांना ’इंडस्ट्रियल इंटिग्रेटेड बिझनेस युनिट’ अशी संज्ञा कंपनीमध्ये वापरली जाते. हे विभाग खालीलप्रमाणे:
बँकिंग आणि भांडवली बाजार
दूरसंचार माध्यमे आणि मनोरंजन
ऊर्जा, युटिलिटीज आणि सेवा
विमा, आरोग्यसेवा आणि जैव शास्त्रे
उत्पादन
रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने आणि पुरवठा यंत्रणा
न्यू ग्रोथ इंजिन
भारतीय उद्योग
यांव्यतिरिक्त, येथे स्तरीय विभाग (हॉरिझॉंटल बिसनेस युनिट) आहेत:
^"इन्फोसिसच्या इतिहासातील प्रमुख घटना". rediff.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-10-07. 7 ऑक्टोबर 2017 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
^"कंपनीचा इतिहास". infosys.com. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-09-27. 23 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)