मंचरकडून भिमाशंकरकडे जाताना डिंभे गाव लागते. तेथून डाव्या बाजूला साधारपणे अर्धा-पाउन किलोमिटरवर गोहे गाव लागते. शांत नयनरम्य परिसर. चहूबाजूने डोंगरांनी वेढलेले. जणू कोकणातील एखाद्या गावात आल्यासारखे वाटते. खाचरांची शेत जमिन. पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती. येथील सालसिध्देश्वर हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.