सेरी आ (इटालियन: Serie A) ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.