सिडनी विमानतळ किंवा किंग्सफोर्ड-स्मिथ विमानतळ (Sydney Airport) (आहसंवि: SYD, आप्रविको: YSSY) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. सिडनीपासून २३ किमी अंतरावर मॅस्कट ह्या उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या तर जगामध्ये ३१व्या क्रमांकावर आहे. १९१९ साली सुरू झालेला हा विमानतळ सिडनीमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.