सिंगापूरमधील बौद्ध धर्म हा देशातील सर्वात मोठा धर्म आहे. जवळजवळ ३३.२% लोक बौद्ध धर्माचे पालन करतात. २०१५ मध्ये, ३२,७६,१९० सिंगापूरवासीयांनी मतदान केले, त्यापैकी १०,८७,९९५ (३३.२१%) लोकांनी 'बौद्ध' म्हणून ओळख सांगितली होती.[१]
सिंगापूरमध्येबौद्ध धर्माची सुरुवात प्रामुख्याने मागील शतकानुशतके जगभरातून आलेल्या परप्रांतीयांनी केली होती. सिंगापूरमधील बौद्ध धर्माची प्रथम नोंदींचा इतिहास सरुवातीच्या बौद्ध मठांमध्ये आणि विशेषतः आशियातील जगाच्या विविध भागांतून आलेल्या स्थायिकांनी बांधलेली थियन हॉक केंग आणि जिन लाँग सी मंदिर अशा बौद्ध मंदिरेमध्ये पाहिला जाऊ शकतो.