सरफराज खान (२७ ऑक्टोबर, १९९७:मुंबई, भारत - हयात) हा भारतचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.त्याचा भाऊ आता मुशिर खान U19 World Cup 2024 मध्ये खेळत आहे.
भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये सरफराज मुंबईकडून खेळतो. २०१५ ते २०१८ दरम्यान तो उत्तर प्रदेशकडून देखील खेळला. सरफराजला २०१५ मध्ये आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने २०१५ च्या आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केले. बंगलोर संघासोबत तो २०१८ पर्यंत आयपीएल खेळला. त्यानंतर २०१९ च्या आयपीएल मोसमाच्या लिलावात त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले.