संतोष मोहन देव (एप्रिल १,१९३४-ऑगस्ट २,२०१७) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९९६,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील सिल्चर लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्रिपुरा राज्यातील पश्चिम त्रिपुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. २००५ ते इ.स. २००९ या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये उद्योगमंत्री होते.त्यांचा इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या कबींद्र पुरकायस्थ यांनी पराभव केला.