२७ सप्टेंबर २०१७ रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी पंचांची निवड केली.[४] दुसरा कसोटी सामना दिवसा / रात्र खेळवला गेला, तो श्रीलंकेसाठी पहिलाच दिवस / रात्र कसोटी सामना होता.[५] श्रीलंकेने कसोटी मालिका २–० ने जिंकली. पाकिस्तानचा हा ऑक्टोबर २००२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ३-० व्हाईटवॉश नंत पाकिस्तानचा हा घरच्या मालिकेतील दुसरा तर संयुक्त अरब अमिरातीमधील पहिलाच व्हाईटवॉश.[६] पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ५-० अशी जिंकली.[७] एकाच वर्षात तीन एकदिवसीय मालिकांमध्ये ५-० असा व्हाईटवॉश मिळणारा श्रीलंका हा पहिलाच संघ. ह्या आधी त्यांना जानेवारी मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून तर ऑगस्टमध्ये भारताकडून व्हाईटवॉश मिळाला होता.[८]
पाकिस्तानमध्ये पुनरागमन
ऑगस्ट २०१७ मध्ये, श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष थिलंगा सुमथिपला म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन टी२० सामन्यांपैकी एक पाकिस्तानातील लाहोर येथे खेळायला आवडेल.[९][१०][११] मार्च २००९ मध्ये, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमकडे जात असताना असताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर, केवळ झिम्बाब्वेने मे २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.[९] २००९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात श्रीलंकेच्या सध्याच्या संघातील, चामर कपुगेडेरा आणि सुरंगा लकमल हे दोघे त्यावेळी बसमध्ये होते आणि या मालिकेसाठीसुद्धा ह्या दोघांची निवड टी२० संघात होण्याची शक्यता आहे.[१२]
सप्टेंबर २०१७ मध्ये, सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले, ज्यामध्ये टी२० मालिकेतील लाहोरमध्ये होणाऱ्या शेवटच्या सामन्याचा समावेश होता. [१३] श्रीलंका क्रिकेटने म्हणले की, लाहोरमधील क्रिकेट सामना खेळण्यासाठी "कंत्राटी बंधन" आहे, परंतु पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या कोणत्याही खेळाडूला दंड होणार नाही. [१२] तथापि, १४ ऑक्टोबर २०१७ रोजी, श्रीलंकेच्या संघाने सदर सामना तटस्थ ठिकाणी हलविला जाण्याची विनंती करून, पाकिस्तानला जाण्याची आपली अनिच्छा व्यक्त केली. [१४] १६ ऑक्टोबर २०१७ रोजी, श्रीलंका क्रिकेटने जाहीर केले की, लाहोरमध्ये खेळलेला जाणारा सामना ठरल्याप्रमाणेच होईल, परंतु त्यांचा मर्यादित षटकांमधील कर्णधार उपुल तरंगा यांने सामन्यातून माघार घेतली. [१५] खेळाडूंना सामन्याबद्दल चिंता वाटत असतानाही, संघाचे व्यवस्थापक असांका गुरूसिंघे यांना वाटले की, या सामन्यासाठी एक स्पर्धात्मक संघच निवडला जाईल. [१६] १९ ऑक्टोबर, २०१७ रोजी श्रीलंकेचे मुख्य निवडणूक अधिकारी ग्रॅहम लेब्रोय म्हणाले की, लाहोरला न जाण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडूंची इतर दोन टी२० सामन्यांसाठी निवड होण्याची शक्यता नाही.[१७] त्यानंतर दोनच दिवसांनी टी२० संघ जाहीर कण्यात आला, त्यासाठी थिसारा परेराला कर्णधार म्हणून निवडले गेले.[१८]
श्रीलंकेचा संघाचे "असाधारण" सुरक्षेमध्ये लाहोर येथे आगमन झाले आणि बॉम्ब-प्रूफ बसमधू ते संघाच्या हॉटेलकडे रवाना झाले. .[१९] लाहोर ट्वेन्टी२० आधी, श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष थिलंगा सुमथिपला म्हणाले की, पाकिस्तानचा दौरा संघासाठी विशेष आहे आणि ह्यामुळे भविष्यात देशाला इतर दौऱ्यांच्या आयोजनासाठी मदतच होईल. [२०] पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले की, हा सामना म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट देशात पुन्हा येण्याची सुरुवात आहे, तसेच त्यांना आशा वाटली की २०२० च्या अखेरीपर्यंत सर्व देश पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळतील. [२१] पाकिस्तानने टी२० मालिका ३-० ने जिंकली. [२२] सामना संपल्यानंतर एशियन क्रिकेट काउन्सिलने जाहीर केले की एसीसी एमर्जिंग संघ एशिया चषक, २०१८ पाकिस्तानमध्ये एप्रिलमध्ये खेळला जाणार असल्याचे जाहीर केले.[२३]