श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान झिम्बाब्वे दौरा केला. सुरुवातीला जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक टी२० सामना खेळवला जाणार होता.[१] ऑगस्ट २०१६, मध्ये जाहीर केले गेले की ह्या दौऱ्याऐवजी झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज दरम्यान त्रिकोणी मालिका खेळवली जावू शकते.[२] सप्टेंबर २०१६ मध्ये जाहीर केले गेले की मर्यादित षटकांच्या सामन्यांऐवजी त्रिकोणी मालिका खेळविली जाईल आणि श्रीलंकेचा संघ झिम्बाब्वेमध्ये फक्त दोन कसोटी सामने खेळेल.[३]
उभय संघांदरम्यान याआधी २००४ मध्ये कसोटी सामना झाला होता.[४] मालिकेतील पहिली कसोटी ही झिम्बाब्वेची १०० वी कसोटी आहे.[४] मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डीआरएस पद्धत वापरली गेली.[५] झिम्बाब्वेमध्ये हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले गेले, याआधी जास्त किंमतीमुळे ही पद्धत वापरात नव्हती.[५]
दुखापतीमुळे अँजेलो मॅथ्यूज ऐवजी रंगना हेराथ कडे श्रीलंकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले.[८]