छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पूर्वीचे शिवाजी पार्क[१] हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेना आणि मनसे समर्थक शिवतीर्थ असे संबोधतात.
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला [[शिवाजी महाराजांचा] पुतळा इ.स. १९६६मध्ये उभारण्यात आला.