राष्ट्रीय महामार्ग

भारतीय राष्ट्रीय महामार्गांचे जाळे

राष्ट्रीय महामार्ग (रा. म.) हे भारतातील मुख्य रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे भारतभर ६६,५९० कि.मी. पसरले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही भारत सरकारच्या नवव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत १९९५ साली स्थापन केलेली एक संस्था आहे. ही राष्ट्रीय महामार्गांच्या विकास, बांधकाम तसेच देखभालीसाठी जबाबदार आहे. भारताच्या एकूण रस्त्यांच्या फक्त २ % रस्ते रा. म. आहेत, पण एकूण रस्ता वाहतुकीच्या ४०% वाहतुकीसाठी ते कारणीभुत आहेत[].

मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग (रा. म. ४)

उत्तर प्रदेशातील वाराणसी ते तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत धावणारा तसेच जबलपुर, नागपूर, हैदराबादबंगळूर ह्या प्रमुख शहरांना जोडणारा २३६९ किमी लांब रा. म. ७ हा सर्वात लांब तर एर्नाकुलम ते कोची असा ६ किमी धावणारा रा. म. ४७अ हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. दिल्लीआग्रा (रा. म. २), दिल्लीजयपुर (रा. म. ८), अमदावादवडोदरा (रा. म. ८), मुंबईपुणे (रा. म. ४), बंगळूरचेन्नई (रा. म. ४) हे राष्ट्रीय महामार्गांवरील काही सर्वाधिक गर्दीचे पट्टे आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!