मार्टिन लुथर (जन्म - नोव्हेंबर १०, इ.स. १४८३ - मृत्यु - फेब्रुवारी १८, इ.स. १५४६) हे ख्रिश्चन धर्मगुरू, साधू, तत्त्वज्ञानी व धर्मसुधारक होते. त्यांचा जन्म जर्मनीतील आईलबर्न येथे गरीब खाणकामगाराच्या कुटुंबात झाला. मार्टिन ल्युथर यांनी धर्मसुधारणेचा जाहिरनामा प्रसिद्ध केला होता तसेच त्यांनी बायबलचे जर्मन भाषेमध्ये भाषांतर केले. मार्टिन ल्युथर यांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मसत्तेचा निषेध केला म्हणून त्यांना 'प्रॅाटेस्टंट' असे म्हणले जाई. यातून पुढे ख्रिस्तीधर्मात प्रोटेस्टंट पंथ उदयास आला.