जेथे हे विमान कोसळले तो भूभाग सध्या रशियामध्ये सामील होऊ पाहणाऱ्या फुटीरवादी गटाच्या ताब्यात असून येथे युक्रेन सरकारचे अधिपत्य नाही. एम.एच. १७ विमानामधील २८३ प्रवासी व १५ कर्मचारी अशा एकूण २९८ व्यक्ती ह्या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडल्या. हे विमान नक्की कोणी पाडले ह्याबद्दल तपास सुरू असून अमेरिकेने ह्यासाठी फुटीरवादी गटाला व त्यांना पाठिंबा देणाऱ्या रशियाला ह्या घातपातासाठी जबाबदार धरले आहे तर फुटीरवाद्यांनी जबाबदारी नाकारली आहे. रशियाने युक्रेनकडे बोट दाखवले आहे.
मार्चमध्ये गूढ प्रकारे गायब झालेल्या मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० नंतर मलेशिया एरलाइन्सच्या विमानाला झालेली २०१४ सालामधील ही दुसरी मोठी दुर्घटना होती.