बौद्ध मंदिर हे बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या बौद्धांचे एक उपासना स्थळ आहे. यामध्ये विहार, स्तूप, चैत्य, वॅट आणि पॅगोडा हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये व भाषांमध्ये समाविष्ट होतात. बौद्ध धर्मातील मंदिर म्हणजे बुद्धांचे शुद्ध क्षेत्र किंवा शुद्ध वातावरण होय. पारंपारिक बौद्ध मंदिरे आंतरिक आणि बाह्य शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली आहेत.[१] त्याची रचना आणि वास्तुविशेषता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बदललेली आढळते. सहसा, मंदिरामध्ये केवळ इमारतींचाच नव्हे तर सभोवतालचे पर्यावरणही असते. बौद्ध मंदिरे ५ घटक चिन्हांकित करण्यासाठी डिझाइन केले आहेत: अग्नी, वायु, पृथ्वी, पाणी आणि शहाणपण.[२]