बाहुबली किंवा बाहुबली:द बिगिनिंग हा तेलुगू आणि तमिळ भाषेत बनलेला भारतीय चित्रपट आहे. शोभू यार्लागड्डा व प्रसाद देवीनेणी निर्मित हा चित्रपट बाहुबली चित्रपटशृंखलेचा हा पहिला भाग आहे.
एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, राणा दगूबत्ती, तमन्ना व अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. सोबत सत्यराज, रम्या कृष्णन, नासर व सुदीप यांनीही काम केले आहे.
चित्रपटात किलीकी या कृत्रिम भाषेचा वापर केला आहे. भारतीय चित्रपटात कृत्रिम भाषेचा वापर पहिल्यांदाच झालेला असून तिची निर्मिती मदन कार्की या लेखकाने केली आहे.
हा सिनेमा १० जुलै २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाला हिंदी व मल्याळम भाषेतही डब करून प्रदर्शित केले गेले. चित्रपटाचा दूसरा भाग 'बाहुबली २' किंवा बाहुबली २: द कन्क्लुजन २८ एप्रिल २०१७ मध्ये प्रदर्शित झाला आहे.
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | |
---|
१९८१-२००० | |
---|
२००१-सद्य | |
---|