कासव (चित्रपट)

Kaasav (es); कासव (hi); ಅಂತರ್ಗತ (kn); କାସବ (or); Kaasav (en); कासव (mr); কাসভ (bn); కాసవ్ (te) film indien (fr); 2016 Marathi-language film directed by Sumitra Bhave–Sunil Sukthankar (en); Film von Sumitra Bhave-Sunil Sukthankar (2016) (de); ମରାଠୀ କଥାଚିତ୍ର (or); 2016 Marathi-language film directed by Sumitra Bhave–Sunil Sukthankar (en); film India oleh Sumitra Bhave–Sunil Sukthankar (id); సుమిత్రా భావే-సునీల్ సుఖ్తంకర్ దర్శకత్వంలో 2016లో విడుదలైన మరాఠీ సినిమా (te); film uit 2016 van Sumitra Bhave–Sunil Sukthankar (nl)
कासव 
2016 Marathi-language film directed by Sumitra Bhave–Sunil Sukthankar
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
उत्पादक
दिग्दर्शक
  • Sumitra Bhave
  • Sunil Sukthankar
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • ऑक्टोबर, इ.स. २०१६
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कासव हा २०१६चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट असून तो ६ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुमित्रा भावेसुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केला आहे आणि भावे-सुकथनकर यांची निर्मिती कंपनी "विचित्र निर्मिती" यांच्या संयुक्त विद्यमाने मोहन आगाशे यांनी निर्मित केला आहे.[] या चित्रपटाने ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकणारा हा पाचवा मराठी चित्रपट ठरला.

कथानक

मानव (आलोक राजवाडे) यांला आपले मनगट कापण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो इस्पितळातून पळून जातो. जानकी (इरावती हर्षे) त्याला रस्त्याच्या कडेला पडलेली बघते. आपल्या ड्रायव्हर यदु (किशोर कदम) याला देवगड, कोंकण येथील घरी मानवला नेण्यास सांगिते. तिथे ती मानव साठी एका खासगी डॉक्टरची नेमणूक करते. जानकीचा घटस्फोट झाला असून ती एकटीच असते. बहुतेकदा तिला येणाऱ्या भीतीच्या झटक्यासाठी मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेते. ऑलिव्ह रॅडली समुद्री कासवाचे संवर्धन कार्यक्रमात कार्यरत दत्ताभाऊ (मोहन आगाशे) यांनाही ती मदत करते.

निर्माण

मोहन आगाशे यांनी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांचा पूर्वीचा अस्तु (२०१६) या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती व प्रमुख भूमिका पण साकारली होती. इरावती हर्षे देखील त्या चित्रपटात मुख्य भुमिकेत होत्या. न्यू जर्सी येथील एका जोडप्याने, प्रकाश आणि अलका लोथे, यानी अस्तु चित्रपट पाहिले आणि त्यांना तो आवडला. मानसिक विकारांवर आधारित आणखी एक चित्रपट करण्यासाठी त्यांनी निर्मात-दिग्दर्शकांना ५० लाख रुपये दिले.[] भावे – सुकथनकर यांना उदासीनतेवर आधारित अश्या कासव चित्रपटासाठी निर्मात्यांना तयार करणे अवघड झाले. आगाशे यांनी भावे आणि सुकथणकर यांच्यासमवेत या चित्रपटाची निर्मिती केली.[]

चित्रपटाचे चित्रीकरण देवगडच्या समुद्र किना-यावर १८ दिवसांच्या काळात करण्यात आले. ऑलिव्ह रॅडली समुद्री कासवांच्या जीवनावर आणि त्यांच्या प्रजनन चक्राचे आणि तरुणांमध्ये नैराश्याचे प्रकरण असे एकत्रित चित्रित केले आहे.[][] ह्यासाठी अश्या धोकादायक प्रजातींविषयी बरेच संशोधन केले गेले. आगाशे स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आसल्याने त्यांनी चित्रपट निर्मात्यांना वैद्यकीय साहित्य पुरवले ज्यामध्ये मानसोपचारतज्ज्ञ आणि संशोधक विक्रम पटेल यांच्या "व्हेर देर इज्नो साईक्याट्रीस्ट: अ मेंटल हेल्थ केर मॅन्युअल" या पुस्तकाचा समावेश पण होता.[]

पुरस्कार

या चित्रपटाला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लोटस पुरस्कार (स्वर्ण कमल) मिळाला. पुरस्कारात असे म्हणले आहे की पर्यावरणीय वर्तनाची व वैयक्तिक व्यक्तिरेखेचे परिपूर्ण मिश्रण आणि अत्यंत सुंदर चित्रीकरणासाठी कौतुक म्हणुन हा पुरस्कार देण्यात येत आहे.[] या पुरस्कार जिंकणारा हा पाचवा मराठी चित्रपट ठरला आणि आधीचे चित्रपट होते: श्यामची आई (१९५४), श्वास (२००३), देऊळ (२०११) आणि कोर्ट (२०१४).[]

या चित्रपटाने मुंबई फिल्म फेस्टिव्हल (२०१६), कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (२०१६), केरळचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (२०१६), बेंगलोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (२०१७) आणि न्यू यॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव (२०१७) यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही भाग घेतला होता. चीनमध्ये झालेल्या ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हल - २०१७ मध्ये नायक आलोक राजवाडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.[]

संदर्भ

  1. ^ "17th Annual New York Indian Film Festival". New York Indian Film Festival. 2017-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 May 2017 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d Mascarenhas, Anuradha (8 April 2017). "It's about helping beat depression with acceptance, love: Kaasav director Sumitra Bhave". The Indian Express. 8 May 2017 रोजी पाहिले.
  3. ^ Chatterji, Shoma (9 April 2017). "Kaasav, A Marathi Film That Has Won Laurels But Where Are the Distributors?". The citizen. 2017-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Janjali, Arwa (24 October 2016). "Allow youngsters space and they will explore life on their own". Sakaal Times. 4 May 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "64th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 6 June 2017 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 April 2017 रोजी पाहिले.
  6. ^ Bhanage, Mihir (11 April 2017). "Kaasav and Ventilator's big win at the National Awards". द टाइम्स ऑफ इंडिया. 4 May 2017 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!