श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आणि इ.स. १९५३ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला असून माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये' सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.[१]
संदर्भ
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | |
---|
१९८१-२००० | |
---|
२००१-सद्य | |
---|