फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. फिफाद्वारे आयोजीत केली जाणारी ही स्पर्धा सध्या दर चार वर्षांनी खेळवली जाते. ह्या स्पर्धेत जगातील सहा फुटबॉल महामंडळांमधून प्रत्येक एक संघ निवडला जातो. विद्यमान विश्वचषक विजेता तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ह्यांना ह्या स्पर्धेत आपोआप प्रवेश मिळतो. आशियामधून ए.एफ.सी. आशिया चषक विजेता, आफ्रिकेमधून आफ्रिका देशांचा चषक विजेता, उत्तर व मध्य अमेरिकेमधून कॉन्ककॅफ गोल्ड चषक विजेता, दक्षिण अमेरिकेमधून कोपा अमेरिका विजेता, ओशनियामधून ओ.एफ.सी. देशांचा चषक विजेता तर युरोपामधून युएफा यूरो विजेता देश कॉन्फडेरशन्स चषकासाठी पात्र ठरतात.
१९९२ साली सौदी अरेबियामध्ये किंग फहाद चषक ह्या नावाने ह्या स्पर्धेची सुरुवात झाली.
निकाल
किंग फहाद चषक
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक
संदर्भ
बाह्य दुवे