न्यू ऑर्लिन्स (इंग्लिश: New Orleans; फ्रेंच: La Nouvelle-Orléans) हे अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील सर्वात मोठे शहर व अमेरिकेतील एक मोठे बंदर आहे. या शहरास 'क्रेसेंट सिटी', 'नोला' वा 'द बिग ईझी' असेही संबोधतात. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदी व पॉंचरट्रेन सरोवराच्या काठावर वसले असून ह्या शहराचे अनेक भाग समुद्रसपाटीच्या खाली स्थित आहेत. सुमारे १२.३५ लाख लोकसंख्या असलेले न्यू ऑर्लिन्स महानगर क्षेत्र अमेरिकेत ४६व्या क्रमांकावर आहे. न्यू ऑर्लिन्सची स्थापना फ्रेंच शोधकांनी केली व आजही येथील फ्रेंच वास्तूशास्त्र व फ्रेंच पाककलेसाठी न्यू ऑर्लिन्स प्रसिद्ध आहे.
इ.स. २००५ साली आलेल्या विनाशकारी हरिकेन कट्रिनामुळे न्यू ऑर्लिन्सचे अतोनात नुकसान झाले. ह्या नैसर्गिक धक्क्याच्या खुणा आजही येथे जाणवतात.
खेळ
न्यू ऑर्लिन्स सेंट्स व न्यू ऑर्लिन्स हॉर्नेट्स हे दोन येथील प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ आहेत.
बाह्य दुवे
हे सुद्धा पहा