नेपाळमधील बौद्ध धर्मभारतीय आणि तिबेटी धर्मप्रसारकांच्या माध्यमातून सम्राट अशोकांच्या कारकिर्दीपासूनच पसरला. किरातास हे नेपाळमधील पहिले लोक होते ज्यांनी गौतम बुद्धांच्याशिकवणीचा स्वीकार केला, त्यानंतर लिचाविज आणि नेवार लोकांनी बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला होता.[१] बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ मध्ये शाक्य गणराज्यातलुंबिनी येथे झाला होता.[२] लुंबिनी हे सध्या नेपाळमधील रुपंदेही जिल्हा, लुंबिनी झोनमध्ये आहे.[३][४]बौद्ध धर्म हा नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. २००१ च्या जनगणनेनुसार नेपाळमधील १०.७४% लोक बौद्ध धर्माचे पालन करीत होते, त्यात प्रामुख्याने तिबेटो-बर्मन भाषिक जाती, व नेवार यांचा समावेश होता.[५] तथापि, २०११ च्या जनगणनेत देशातील लोकसंख्येपैकी केवळ ९% लोकसंख्या बौद्धांची होती.[६] नेपाळच्या तेकडी आणि डोंगराळ प्रदेशात हिंदू धर्माने बौद्ध धर्मियांना इतक्या प्रमाणात आत्मसात केले आहे की बऱ्याच बाबतीत त्यांच्यात देवता आणि मंदिरे समान आहेत. उदाहरणार्थ, मुक्तिनाथ मंदिर हे हिंदू आणि बौद्ध दोघांचेही समान उपासनास्थान आहे.[७]
संदर्भ
^Dutt, N. (1966). "Buddhism in Nepal"(PDF). Bulletin of Tibetology. 3 (2): 27–45.
^Thomas, E. J. (1927). "The Birth of Buddha". The Life of Buddha as Legend and History. New Delhi: Asian Educational Services. pp. 27–37. ISBN81-206-0979-4.
^Shastri, G. C (July 1968). "Hinduism and Buddhism in Nepal"(PDF). Ancient Nepal: Journal of the Department of Archaeology. 4: 48–51. July 6, 2012 रोजी मूळ पान(PDF) पासून संग्रहित.