नताशा झ्वेरेव्हा (बेलारूशियन: Наталля Маратаўна Зверава; १६ एप्रिल १९७१) ही एक निवृत्त बेलारूशियनटेनिसपटू आहे. प्रामुख्याने दुहेरी टेनिसवर लक्ष केंद्रित करणाऱ्या झ्वेरेव्हाने आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान १८ महिला दुहेरी तर २ मिश्र दुहेरी अशी एकूण २० ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली. तिने महिला दुहेरीमध्ये एकूण ८० डब्ल्यू.टी.ए. स्पर्धा जिंकल्या. ह्यांपैकी बहुतेक स्पर्धांमध्ये तिची जोडीदार अमेरिकेची जिजी फर्नांडेझ राहिली होती. एकूण महिला दुहेरी विजेतेपदांमध्ये ह्या दोघींचा मार्टिना नवरातिलोवा व पाम श्रायव्हर ह्या जोडगोळीच्या खालोखाल दुसरा क्रमांक आहे.